तू मला हवा आहेस
श्वास घेण्यासाठी
तू मला हवा आहेस
रणरणत्या उन्हात सावली देण्यासाठी
तू मला हवा आहेस
कुडकुडणाऱ्या थंडीत उब देण्यासाठी
तू मला हवा आहेस
रोज संध्याकाळी तुझी वाट पाहण्यासाठी
तू मला हवा आहेस
तुझ्या प्रेमाची स्वप्ने विणण्यासाठी
तू मला हवा आहेस
एक घरटे बांधण्यासाठी
तू मला हवा आहेस
तुझ्या मिठीत विसावण्यासाठी
तू मला हवा आहेस
पावसात चिंब भिजण्यासाठी
तुझ्याशिवाय किती रे मी एकटी
आता मला फक्त एकच सांग
होशील का तू माजा इंद्रधनुष्य ?
नाही तरी तू मला हवा आहेस
मला अग्नी देण्यासाठी
-- अनु