बंधन

रक्षाबंधन भाउ बहिणीचे

नाते चंद्राशी धरतीचे

अनमोल प्रेम जीवनाचे

रक्षण करी एक्मेकांचे

खोबऱ्यात विरघळणाऱ्या साखरेचे

नाजुक रेशमी धाग्यांचे

बरसणाऱ्या पर्जन्यसरीचे

बंधन अनमोल पावित्रांचे

भावबंध हे ममतेचे

बहिणीत रुप दिसे आईचे

तबकात मोती ओवाळणीचे

लाभू दे वरदान प्रकाशाचे

प्रतिभा देवी