ओंडका
===================
बुडवू पाहती कितीक लाटा..
"मी" तरी हा, बुडतं नाही!..
नाका-तोंडात पाणीच पाणी..
"मी" तरी हा, मरत नाही!..
पोहता पोहता थकली गात्रे..
"मी" तरी हा, गळत नाही!..
बनून हेंदकळे नाव सागरी..
बोट कुणाची बनत नाही!..
धरून राहतो हाती ओंडका..
"मी" तरी हा, तारत नाही..!!!
===================
स्वाती फडणीस....... ०३-०९-२००८