जशी सांज होते, एकांत येतो
बसतो माझ्या सवे,
डोळ्यात माझ्या दाटूनी येती
तुझ्या आठवांचे थवे..
कुठेतरी तु दूर देशी
मिटता मी डोळे मनात येशी,
भान जेव्हा येते मला ते
कुठेतरी तु नाहीशी होशी...
कुठे कधी शोधु तुला मी
माझ्याच मी शोधात आहे,
थकून गेली ती गात्रे मला ही
मी कसल्या भ्रमात आहे.
जयेंद्र.