तेव्हाच नाही नाही म्हणतले, होकार आज कुठला
दोघात जणतोना आपुला हिशेब मिटला.
मिटला हिशेब म्हणता हसते हळूच कोणी
तू मी असेल कैसे, होणे न हे मुळीच.
मिटला हिशेब म्हणशी मग का असे पहाणे?
डोळ्यात मेघ आहे ऒठान्वरी बहाणे.
हे मौन जीवघेणे कासाविस अशी का?
लपाव्या उसासा बाजूस पाहशीका.
आपुला हिशेब चुकला आहे कबूल मजही
माझे गणीत कच्चे हातचा चुकुन राही
आन चक्रवादाने जे झाले अमोल देणे
मिर्वीन जन्मोजन्मी शिरी हे अबोल लेणे.
---जुन्या डायरीत सापडलेली कविता---