वाजत गाजत काल बाप्पा आले
येउन ऐटीत मखरात बसले
आईने त्यांच्यापुढे लाडू ठेवले
म्हणाले नाहीत कशाला एवढे?
वगळून मला त्यांचेच कौतुक झाले
त्यांच्यासाठी जागून साऱ्यांचे डोळे लाल झाले
सकाळी पण बप्पासाठी वेगवेगळा खाऊ
विचारतो मला कि मी आता जाऊ
एवढ्यात मारली बाप्पाने हाक
म्हणाला तु सगळी खीर खाऊन टाक
खीर फस्त करून मी गाढ झोपलो
संध्याकाळी सगळ्यांच्या गडबडीने उठलो
पाहतो तर बाप्पा होते दारात
मागे वळून मला टाटा करतात
आता सगळ घर होईल सुन्न
नका जाऊ बाप्पा मला करून खिन्न
तेवढ्यात बाप्पाने गुपित सांगितले कानात
पुढच्या वर्षी आणेन चॉकलेट तुला डब्यात
स्वारी माझी एकदम खुष झाली
सगळ्यांच्या सोबत मोठ्याने गरजली
गणपती बाप्पा मोरया
पुढच्या वर्षी लवकर या.