पालक पुरी

  • गव्हाचे पीठ ६ वाट्या
  • चण्याच्या डाळी चे पीठ १ वाटी
  • तिखट, मिठ, हळद, ओवा चवीप्रमाणे
  • लसुण पेस्ट १ चमचा
  • मिर्ची कोथिंबीर पेस्ट २ चमचे
  • धने, जिरे पुड १/२ चमचा प्रत्येकी
  • १ पालक जुडी
  • कणीक मळताना लागेल इतके पाणी
२० मिनिटे
४ जणांना ४ ते ५ वेळा
पालक पुऱ्या

सर्वात प्रथम गव्हाचे पीठ व चण्याचे पीठ एकत्र करावे. त्यात वरील सर्व जिन्नस घालावे.

पालकाची जुडी धुवून पेस्ट करून घ्यावी व कणिक मळून घ्यावी तेल लावून  ५ मिनीटे झाकून ठेवावी.

छोटा गोळा घेवून पुरी लाटावी व खरपुस भाजावी.

सारख्या आकाराच्या पुरया हव्या असल्यास वाटी वापरता येते.

पुरी तळून झाल्यावर टिपकागदा वर ठेवावी म्हणजे पुऱी तेलगट लागणार नाही.

तळण नको असल्यास घडीच्या पोळी सारखे लाटल्यास पालक दशमी होते.

प्रवासात मुलांना द्यायला उत्तम! सोबत लसुण चटणी, लोणचे आणी कांदा असेल तर मस्तच !