पपई अननसाची भाजी

  • पिकलेले अननस २५० ग्रॅम
  • पिकलेली पपई २५० ग्रॅम
  • हिरवी सिमला मिर्ची २५० ग्रॅम
  • तूप दोन चमचे
  • मिरे
  • हिरवी मिर्ची ५० ग्रॅम
१५ मिनिटे
चौघांसाठी

अननस व पपईची साल काढून अननस, पपई व सिमला मिर्चीचे लांबसर तुकडे (ज्युलिएन) करून घ्यावेत (साधारण अर्धा इंच बाय दोन इंच). हिरवी मिर्चीसुद्धा बारीक लांबसर चिरून घ्यावी. काळे मिरे कुटून (पण पावडर नको) घ्यावेत.

कढईत दोन चमचे (टीस्पून) तूप घेऊन ते गरम झाले की मिरे घालावेत. लगेच हिरवी मिर्ची, सिमला मिर्ची, अननस (ह्या क्रमात एक एक करून) घालून परतावे.  शेवटी पपई घालून वर दोन चमचे पाणी घालावे आणि झाकण ठेवून दोन मिनिटे शिजू द्यावे. जास्त शिजवायची गरज नाही.

गरमागरम वाढावे.

दुसऱ्या एखाद्या तिखट (नॉनव्हेज) भाजीसोबत ही काहीशी गोड-आंबट आणि किंचित तिखट भाजी छान लागते.