बांगड्याचे तिखले

  • ८ मध्यम आकाराचे बांगडे
  • हळद दीड चमचा, तिखट २ चमचे, गरम मसाला दीड चमचा
  • चिंचेचा कोळ ४ चमचे
  • काळे मिरे ७-८
  • १/२ ते ३/४ नारळाचे खोबरे वाटणासाठी
  • १/४ नारळाचे वाटून चांगली जाड दूध
  • एक कांदा
  • तिरफळे ७-८
  • रिफाईंड तेल ७-८ चमचे
  • मीठ चवीप्रमाणे
१ तास
४ ते ५ जणांसाठी

बांगडे स्वछ्छ करून गरजेप्रमाणे तुकडे करा, हळद, तिखट, गरम मसाला, मीठ, चिंच लावून साधारण अर्धा तास ते ४० मिनिटे ठेवा.

अर्धा कांदा, खोबरे व मिरे मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्या. अर्धा कांदा बारीक चिरून घ्या. 

तिरफळे पाण्यात उकळवून, चांगली ठेचून घ्या.

तेलाची फोडणी करा आणि त्यात चिरलेला कांदा छान लालसर तळसावून घ्या. यात बांगडे व वाटण घाला. बांगडे शिजले की नारळाचे दूध आणि ठेचलेली तिरफळे घाला. मिश्रण जाडसर असू द्या.

गरम वाफाळलेला भात किंवा तांदळाच्या भाकरी बरोबर तिखले मस्त लागते!

या जेवणाबरोबर सोलकढी हवीच!

सौ. आई