कुठवर जीवना तू मला, असं फरफटत नेशील

कुठवर जिवना तू मला, असं फरफटत नेशील

काट्यां वरून कापसाला, असं खरचटत नेशील

नाही ईच्छा पावलांची, मखमलावर चालण्याची

मृत्यू तूही का मला, असचं बरबटत नेशील

आलो कोरड्या दूनियेत, मी माझेचं अश्रूं पुसाया

कोणा एकाच्या तरी, आठवणीत जगवत नेशील

खाली रुतलो चिखलात, वर फेकून दे नर्कात

स्वर्ग कसा असतो, तो तरी दाखवत नेशील

कधी मागितला तुझ्याकडे, काही मिटर कापड

खिशातून काढून रुमाल, चेहरा झाकत नेशील

डिवसलं वेदनांनी सदा, श्वास घेतला तोवर

जाताना तरी त्यांचा, डोळा चुकवत नेशील

चंदनाच्या लाकडासवे, जळण्याची नाही मनिषा

अग्नीची सोय करून, धर्माने सजवत नेशील

हजारो सजीवां मधून, एका निर्जीवाने का जावं

चार खांद्याच्या तरी, पालकीतून गाजवत नेशील

का असंख्य डोळ्यातून, मी थेंब थेंब गळावं

तीच्या दोनच अश्रूंत, मला भिजवत नेशील

@सनिल पांगे