लाल भोपळ्याची सोपी भाजी

  • पाव किलो लाल भोपळा, मेथीचे दाणे
  • हळद, जिरे, मोहरी, हिंग
  • लाल तिखट, काळा मसाला, मीठ
  • कोथिंबीर, सुके खोबरे, तीळ
१५ मिनिटे
३-४ जणांसाठी

१. कढइ मध्ये तेल गरम करून मोहरी, जिरे, हळद व हिंग घालून फोडणी करावी व मेथीचे दाणे घालून परतावे
२. लाल भोपळ्याचे मध्यम आकाराचे चौकोनी तुकडे करून घ्यावेत व फोडणीत घालावेत.
३. कढइ वर झाकण ठेउन व झाकणात थोडे पाणी घालून एक वाफ आणावी.
४. सुके खोबरे व तीळ भाजून घ्यावेत व ते भाजीत  घालावे. हवे असल्यास पूड करून घातले तरी चालेल.
५. अर्धी वाटी पाणी घालावे. तिखट, मीठ, काळा मसाला घालून शिजू द्यावे.
६. भोपळा चांगला शिजल्यावर वरून कोथिंबीर घालून वाढावे.

इतक्या सोप्या पदार्थाला टीपा काय देणार?