व्हेज धिरडे

  • गव्हाचे पीठ-१ वाटी
  • तांदळाचे पीठ-१/२ वाटी
  • मक्याचे पीठ-१/२ वाटी
  • कोबी, गाजर, काकडी यांचा खीस-
  • फरस बी बारीक चिरून
  • कोथिंबीर
  • जिरेपूड-१चमचा
  • लाल तिखट
  • मीठ
  • हिंग
५ मिनिटे
५ ते ६ धिरडी होतात

सर्व पीठे भाज्या एकत्र कराव्या.

त्यामध्ये मीठ, लाल तिखट, हिंग, जिरेपूड, कोथिंबीर घालून एकत्र करावे.

मग त्यात पाणी घालावे. दोश्याच्या पीठाइतपत घट्ट असावे.

मग त्याची धिरडी घालावीत. थोडेसे तेल सोडून दोन्हीबाजूंनी खमंग होऊ द्यावीत.

मुलांना द्यायची असतील तर त्यावर बटर घालू शकता किंवा श्रेडेड चीज घालावे.

मुलांसाठी उत्तम‌. सर्व पीठे भाज्या मुलांनी खाल्ल्याने समस्त आई मंडळी खूश......झटपट तय्यार.

स्वप्रयोग