तोंडल्याचं भरीत

  • तोंडली १/२ किलो
  • एक मोठी वाटीभर दही (आंबट नको)
  • तेल १ छोटा चमचा
  • मोहरी (फोडणीपुरती)
  • ५ लांब हिरव्या मिरच्या (वाटून किंवा बारीक तुकडे करून)
  • १/२ छोटा चमचा हिंग पूड
  • मीठ (चवीप्रमाणे)
  • चिमूटभर साखर (ऐच्छिक)
१५ मिनिटे
४ जणांना एका जेवणापुरेसे

तोंडली प्रेशर कुकर मध्ये मोठ्या आचेवर ३ शिट्ट्या करून शिजवून घ्यावीत.

कुकरमधून बाहेर काढून तोंडल्यातील पाणी काढून टाकावे.

शिजलेली तोंडली रवीने/ डावाने कुस्करावी.

त्यात मीठ, साखर, दही घालून एकजीव करावे.

चमचाभर तेलात मोहरी हिंग मिरची घालून फोडणी करावी.

फोडणी तोंडल्यांवर घालावी व एकजीव करून गरम गरम पानात वाढावे. 

१) डब्यात भरून न्यायचे असेल तर दही अधमुरे असल्यास अधिक चांगले. म्हणजे भरीत आंबूस/कवकवीत लागणार नाही.

२) शिजलेल्या तोंडल्याचे पाणी आमटीला घालावे. आमटी चविष्ट लगते.

३) मोठ्या आचेवर शिट्ट्या केल्याने तोंडली अगदी मेण शिजत नाहीत. सहज कुस्करली जातात पण त्याची पातळ पेज होत नाहि.आणखी मऊ/सरसरीत हवे असल्यास शेवटची शिट्टी मंद आचेवर काढावी.

सासूबाईंच्या हातचं चविष्ट होतं आणि त्यांच पाहून मीही करते.