लाल भोपळ्याची खीर

  • लाल भोपळा एक लहान तुकडा
  • ४ चमचे साखर
  • दिड कप गरम दुध
  • चारोळी २ चमचे, खिसलेले बदाम १ चमचा
  • २ चिमटी वेलदोडा पुड
  • २ चिमटी मीठ
१ तास
३ जण

भोपळा कुकरमध्ये थोडे पाणी घालून शिजवून घ्यावा. शिजलेला भोपळा ब्लेंडरने बारीक करून साखर घालावी आणि एका भांड्यात शिजविण्यास ठेवावे. रटरट उकळू लागल्यावर दुध घालून गॅस लो वर करून ठेवावा. १/२ तास साधारण उकळू द्यावे. बासुंदी सारखी झाली पाहिजे. थोडी कोमी झाल्यावर मीठ, चारोळी, बदाम आणि वेलदोडा पुड टाकावे.

ह्या खिरीत फक्त चारोळी, बदाम टाकावे, बाकीचे ड्राय फ्रुटस चांगले लागत नाहीत. मीठ जरुर टाकावे. दुधाचे प्रमाण कमी जास्त करावे, जेणे करून दुध टाकल्यावर केशरी रंग दिसला पाहिजे, तरच भोपळ्याची चव येते. साखर पण कमी जास्त आवडीप्रमाणे करावी. मी प्रमाण अंदाजे दिले आहे.

सासुबाई