कोबीची गुजराती भाजी

  • कोबी १/२ किलो
  • लाल मिरच्या ४-५
  • १ लहान चमचा खाद्यतेल
  • फोडणीसाठी मोहरी
  • हिंग
  • १ लिंबू
  • मीठ चवीप्रमाणे
१५ मिनिटे
३-४ जणांना एकवेळच्या जेवणापुरेशी

कोबी नेहमीप्रमाणे चिरून घ्यावा.

हिंग मोहरी आणि लाल मिरच्यांची फोडणी करावी. (फोडणीला हळद घालू नये.)

कोबी फोडणीस टाकून परतून घ्यावा पण मऊ शिजवू नये.

लिंबू पिळावे.

गरम गरम खावे.

गरम पोळी असेल सोबत तर उत्तम!

आजेसासूबाई