प्रतिक्षा.

पळभर थांबून सजणा
का हो परतीची धांदल करता?
डोळे भरून साठवूदे तुमची मूर्ती
पुन्हा येणाऱ्या विरही मनमंदिरी पूजेकरिता.

एकदातरी घ्या माझ्या विखुरलेल्या मनाचा ठावठिकाणा
सदैव दिसेल तो तुमच्याच साथीला चिकटलेला.
देहाला सारून देतो दिवस कसातरी कष्टाचा रगाडा
पण रातराणीचा सुगंध करतो व्याकुळ तुमच्या मिलनाला.

शृंगारही नेहमीच पडतो फिका
गजरा पण भासतो नागिणीसारखा
अलंकारही लावून घेतात मग लोखंडी मुलामा
सजणा एकदा सजवूद्या शृंगार तुमच्यासाठी आसुसलेल्या देहाचा.

कधीकधी स्वप्नांची रांगोळी घालते ऋदयाच्या अंगणी
अश्रू मग पसरवतात तिला तुझ्या आठवणींनी.
किती काळ सहन करू ह्या विरहातली आहुती?
सजणा कधी रे येईल आपल्या सहवासाची दीपावली?