आठवतात का रे......

आठवतात का रे.....

आठवतात का रे ते क्षण तुला

नजर भेट झाली होती पहिल्यांदा

मन लाजरे बुजरे झाले होते

त्या वेळी आणि नंतरही कितींदा

आठवतात का रे ते क्षण तुला

हातात हात गुंफले होते पहिल्यांदा

जन्मलो फक्त एकमेकान्साठीच

सुखावलो याने तेव्हा आणि नंतरही कितींदा

आठवतात का रे ते क्षण तुला

घेतल्या आपण आणाभाका पहिल्यांदा

जगण आणि मरण हे बरोबरच

या जन्मी आणि नंतरही कितींदा

...आरती