कच्छी दाबेली

  • पाव, बटर
  • दाबेलीचा मसाला, लाल तिखट, मीठ, हळद
  • पुदिना चटणी आणि चिंचेची चटणी
  • थोडी द्राक्षे , थोडे खारे दाणे, थोडे लाल डाळिंबदाणे
  • २ चमचे तेल
३० मिनिटे
३/४ जणांना

बटाटे उकडून चांगले कुस्करून घ्यावेत. त्यात दाबेली मसाला, हळद, तिखट, मीठ घालून नीट मिसळावे.मग तेलावर हे मिश्रण

परतून घ्यावे. मग एका ताटलीत हे मिश्रण काढून घ्यावे. त्यावर खारे दाणे, द्राक्षे व डाळिंबदाणे पसरून टाकावेत.

पावभाजी साठी आपण पाव मध्यावर अर्धा कापतो, तसे सर्व पाव कापून घ्यावेत. बटर लावून हे पाव गरम करून घ्यावेत.

कापलेल्या एका बाजूला पुदिन्याची चटणी आणि दुसऱ्या बाजूला चिंचेची चटणी लावून मध्ये भाजी भरावी. पुन्हा तव्यावर ठेवून ही दाबेली थोडी गरम करून खायला द्यावी.

आवडी नुसार भाजीत किसलेले चीज घालायलाही हरकत नाही.

खरं म्हणजे हा पदार्थ मी फक्त मुंबईतच खाल्लाय. पण लेखन करताना 'भूप्रदेश'या विभागात मुंबई चे नाव दिसले नाही

आणि पदार्थ प्रकारात 'चाट ' असा प्रकारही दिसला नाही. कृपया प्रशासकांनी नोंद घ्यावी.

माझी मैत्रीण