माझ्या प्रत्येक हास्यामागे
मी दुःखाला लपवत फिरतो,
सुख येतही असेल मला शोधत
मी त्याला झुलवत फिरतो.
तुला विसरताना मी
काही क्षण हरवत फिरतो,
अनोळख्या सारखं वागून
मी आयुष्याला झुरवत फिरतो.
कधी कोणाचे अश्रू पुसतो
कधी कोणाला हसवत फिरतो,
का कोणास ठाउक मी असा
स्वत; ला फसवत फिरतो........
जयेन्द्र.