प्रणिपात कोटि कोटि

दाबून हुंदक्याना  या स्फुंदतात भिंती
हळुवार कंकणांची  किंकीण थांबलेली

क्षण एक खाली झुकले हे उंच उंच ईमले
पायातली तयांच्या  मजबूत वीट हलली

तुमच्याच दर्शनाची तिज आस होती दादा
करुनी हृदय समर्पित हलकेच ती निमाली

वय थोरले परंतु वार्धक्य नाही आले
सेवेत देह झिजला जीवन सुवर्ण झाले

अवघ्या नभास भेदून वैकुंठी लीन झाली
प्रणिपात कोटी कोटी त्या थोर माउलीला

कवी सुरेशचंद्र जोशी डोंबिवली

२२/११/२००८