कण कण..... किलबिल
सडा सडा.... मनभर
ओठ ओठ...जिवालागी
गाणं गाणं..... मनभर
अंग अंग...... डोळाभर
प्रीत प्रीत..... मनभर
रस रस..... ओठांवर
चव चव..... मनभर
तडे तडे..... काळजात
कळा कळा...... मनभर
नाव नाव..... वाऱ्यावर
ओढ ओढ...... मनभर
सुटी सुटी... जपणूक
छळ छळ...... मनभर
साद साद.... जन्मभर
आग आग..... मनभर
वाट वाट..... तिरकीच
काटे काटे..... मनभर
सारे सारे... पाणी पाणी
खळाळते..... मनभर
ओल्यावल्या..... कडा कडा
भोवराच......मनभर