'व्याकलन' भाग-तीन

भाषेतून बोलणं व लिहीणं यातील फरक :
जिथं भाषेतून बोलणं हि एक ‘क्रिया’ आहे तिथं भाषेतून लेखन करणं हि एक ‘कृती’ असते. भाषचे उच्चारण हे भाषेचे 'एक स्वरूप' आहे. याउलट 'लेखन करणं' हे आपले विचार व भाव 'उच्चारातून' हवेत विरून जावू नयेत तसेच ते जास्तीत जास्त लोकांपर्यंत स्थल-कालाची मर्यादा ओलांडून पोहचावेत, त्याच सोबत मानवी प्रगत समाजात आपल्याला हवे ते ईप्सित साध्य व्हावे ह्यासाठीची ‘एक सोय' आहे.

कृती म्हटली कि नियम हे आलेच :
भाषा ही 'ध्वनी' व 'भाव' यांची मिळून बनलेली असते. भाव समजून घेण्यासाठी 'ध्वनी' एकू वा समजता यायलाच हवा हे गरजेचे नसते. परंतु विचारांचा गुंता वा भावनांच्या छटा नेहमीच आपल्या ईच्छीत श्रोत्या पर्यंत नेमक्या पोहचतीलच असे होत नाही. आणि म्हणूनच एखाद्या भाषेच्या 'ध्वनी एका  मागोमाग एक उच्चारण्याच्या पद्धती व तऱ्हा' ह्यांचा अभ्यास करताना, लिखाणातून विचारांचा गुंता कागदावर उतरवून नियमबद्ध केला जातो. ह्या नियमबद्ध केल्या जाणाऱ्या काल्पनिक सांगाड्यालाच त्या भाषेचे 'तत्कालिक व्याकरण' म्हणायला हवे. भाषेचे व्याकरण ह्या विषयाच्या पद्धतशीर अभ्यास करण्याला, आकलन करून घेण्याला 'व्याकलन' म्हटले जाऊ शकते.

व्याकरणाच्या अभ्यासा आधी लिखाणाचा अभ्यास :
भाषेच्या व्याकरणाचा पद्धतशीर अभ्यास करायचा म्हटला तर 'लेखन' हि कला समजून घेणं ही गरजेचे ठरते. आणि म्हणूनच व्याकरण विषयात  लिपी म्हणजे काय? ह्याचे थोडक्यात विवेचन येणं हे क्रमप्राप्त ठरतं. ह्या स्तराच्या पलीकडे 'लिपी',   'उच्चार', 'ध्वनी' ह्या व इतर विषयांचे विश्व स्वतंत्रपणे सूरू होतं. लिपी म्हणजे काय? वर्ण म्हणजे काय? वर्णांचे उच्चार कसे करावेत? या विषयांचा आभ्यास झाल्यानंतरच 'व्याकरण' हा विषय अभ्यासण्यासाठी येवू शकतो.

परंतु 'घोडं अडलय कुठं'?
मराठी भाषकांनी, खरेतर मराठी भाषेच्या तज्ञांनी 'अक्षर' ह्या संकल्पनेपर्यंतच स्वतःचा अटकाव करून घेतलेला आहे. ह्या कामात 'शुद्धलेखनाचे नियम' ( खरेतर 'प्रमाण लिखाणाचे नियम' असे म्हटले जायला हवे कारण जिथं ‘लेखन’ ही क्रिया असते, तिथं ‘लिखाण’ हे त्या क्रियेचे फलित म्हणजे 'कृती' असते.) अगदी महत्त्वाची कामगिरी बजावतात.

'उच्चारण' ह्या विषया संदर्भातः
‘अक्षर’ ह्या संकल्पनेच्या पूढे 'वर्ण' हि संकल्पना आहे.   कारण ‘अक्षर’ हा उच्चारीत ध्वनी 'क्शर' व 'स्वर' यांनी मिळूनच बनलेला व  हे ध्वनी उच्चारानंतर हवेत विरून जावू नयेत त्यांना कायम स्वरूप मिळावे ह्यासाठी ते चिन्हांनी म्हणजेच 'वर्णांनी' धरून ठेवलेले असतात. काळाच्या ओघात संकल्पनांच्या नावांमध्ये फेरफार झालेली आहे त्यामूळे 'अक्षर' ह्या संकल्पनेला 'वर्ण' ह्या संकल्पनेचा अर्थ मिळाला आहे.
मुळ संकल्पना :-
'वर्ण'= ['क्शरचिन्हं' + 'स्वरचिन्हं'], [ 'क्शरचिन्हं'+ 'क्शरचिन्हं' + 'स्वरचिन्हं'+ 'स्वरचिन्हं']
'अक्शर'= ['क्शर' + 'स्वर'],
सध्याचा समज :-
'अक्शर'=['क्शरचिन्हं' + 'स्वरचिन्हं']
किंवा जोडाक्शर=['क्शर’+’क्शर’+’स्वर’+ ‘उपस्वर’(ं)]
ह्या मुळेच 'सुंदर अक्षर', 'हस्ताक्षर', 'स्वाक्षरी', 'जोडाक्शर' हे शब्द नावारुपाला आले. 'वर्णमाला' हा शब्द मागे पडून 'बारा अक्शरीं' पासून 'बाराखडी' तयार झाली.
 
उदा. :- 'भक्तां' ह्या शब्दातला 'क्तां' ह्या अक्शरा मध्ये मूलत: 'दोन क्शर+ एक स्वर + एक अनुस्वर' आहेत परंतु 'वर्ण' ह्या संकल्पनेकडे दुर्लक्ष होत असल्यामुळे 'एक अक्षर म्हणजे एक ध्वनी उच्चार' हि अक्षराची संकल्पना नव्या संगणकी युगात अडगळीची होत जाणार. अक्षर हि संकल्पना उच्चारांशी संबंधित आहे. वर्ण ही संकल्पना 'चिन्ह' व त्यांची आपआपसातील सांगड ह्या संबंधाची आहे.
 
'लेखन' ह्या विषया संदर्भातः
‘वर्ण’ हे त्या अक्षराचे म्हणजे त्या उच्चारीत ध्वनीचे, चित्रांकित चिन्हं असते.   वर्ण हे 'क्शरचिन्ह' व 'स्वरचिन्हं' यांचे बनलेले असते. हि संकल्पना देखिल मान्यता पावली तरच:-
( उच्चारातील एक ध्वनी ) = ( लिखाणातील एक वर्ण अर्थात ‘एक चिन्ह’ )
‘एक ध्वनी उच्चार समसमान एक वर्ण’ हे समीकरण मागे पडून सध्याचा युगानूसार संगणकी विश्वातील ग्लिफ म्हणजेच चित्रांकित चिन्हं, त्यांची आप-आपसातील मांडणी व एकच दिशा जपणारी पद्धत ह्या बाबी पुढे येवू शकतील, तेंव्हाच त्यांना अपेक्षित व पात्रतापूर्ण महत्व प्राप्त होवू शकेल. जे मराठीच्या भाषिक विकासासाठी उपयोगाचे होवू शकते.

मनाच्या एकाग्रतेचे ‘केंद्रमध्य’:
वाचनाचे महत्त्व विषद करताना व्यापक दृष्टी, विपूल माहीती, बहूश्रूतता प्राप्त होण्यासाठी जास्त वाचन केले जावे असे शिकवले जाते. त्यासाठी वाचताना एकाच दृष्टीक्षेपात दोन ते तीन शब्द वाचले जावेत व त्यांचे अर्थ लक्षात ही यायला हवेत ह्यावर भर दिला जातो. पण हे सारं फक्त वाचनापूरतंच. म्हणजे वाचताना एकाग्रतेचे केंद्रमध्य’ शब्दांच्या अर्थावर स्थिरावले जावे हि अपेक्षा असते. लेखन करताना मात्र लिपीच्या नियमांचे पालन करता-करता 'शुद्ध लेखनाचे नियम ही पाळावे लागतात. असे होण्याने लेखन करताना एकाग्रतेचे मध्य-वर्तुळ विचारांवर वा भावनांवर स्थिर न होता, 'शुद्ध लेखनाच्या नियमांनी विचलित होते.   ह्याचा परीणाम 'ज्या मंडळीना 'शुद्ध लेखनाचे नियम' लक्षात ठेवणं जमतं अशांनीच लेखन करावं ईतरांनी करू नये, वा त्या फंदात पडू नये' अशी जाळी-जळमटं समाजाच्या मानसिकवर तयार झालेली आहेत. सर्वसामावेशकता ह्या तत्त्वाला विरोध करणाऱ्या अशा नियमांच्या माध्यमातून मुठभरांचीच ‘लेखन कलेवर’ असलेली पकड हे एकंदरीत समाजाच्या भल्याचे नाही.

व्याकरणाची नवी मांडणी :
भाषेत व्यक्त होणाऱ्या भावना, विचार ह्यांना वेगळ्या अर्थछटा असू शकतात, व त्या वेगवेगळ्या स्तरावरच्याही असू शकतात.   त्या त्या स्तरावर त्या अर्थछटांचे यथायोग्य आकळून* घेण्यासाठीच भाषेचे व्याकलन अचूक असणे गरजेचे असते. (* भावना 'समजून घ्यायच्या' असतात. विचार 'आकळायाचे' असतात. ह्या भेदाने हा शब्द योजित आहे. ) भाषेच्या 'व्याकरण व्यवस्थे'चे आकलन करून घेण्यासाठी दोन चिकित्सा पद्धती आपल्या समोर येथे सादर करीत आहे.

१. 'सुक्ष्म स्तरावरील अविलगीय विश्लेषण'
२. बृहद स्तरावरील विलगीय विश्लेषण' 

१. 'सुक्ष्म स्तरावरील अविलगीय विश्लेषण'

रुपिका:
येथे आपण 'सुक्ष्म स्तरावरील अविलगीय विश्लेषण' हि चिकित्सापद्धती विचारात घेवूया. भाषेत अर्थव्यक्ती करणारी 'भाषिक रूपं' असतात. अशा भाषिक रुपांना आपण येथे 'रूपिका' म्हणूया. सुक्ष्म विश्लेषण पद्धतित विविध स्तर असतात. वेगवेगळ्या स्तरावर ह्या 'रुपिका' भिन्न-भिन्न पद्धतीने आकळल्या जातात.हे स्तर पुढीलप्रमाणे:-
१. अक्षर बोधन स्तर

२. शब्द बोधन स्तर

३. वाक्य बोधन स्तर

विश्लेषणात स्तर कशासाठी? :
इंद्रधनुष्यामध्ये अनेक रंग असतात. इंद्रधनुष्याच्या त्या सप्तरंगी कमानीवर थोड्या-थोड्या अंतरावर रंगछटा बदलत जातात. तिथं प्रत्येक रंगाला स्वतःचं स्वतःपुरतं म्हणता येईल असं 'अवकाश' असतं.   ह्या प्रत्येक अवकाशाला स्वतःची व्याप्ती असते, स्वतःचं क्षितिज असते. उलटपक्षी असं म्हणता येईल ह्या अवकाशाला स्वतःच्याच क्षितिजांच्या मर्यादा असतात. क्षितिज बदलले कि नियम बदलतात. आणि नियम बदलतात म्हणूनच थोड्या-थोड्या अंतरावर रंगछटा ही बदलत जातात. अगदी तसेच व्याकरणात हि प्रत्येक बोधन स्तरावरचे नियम त्या-त्या पातळीनुसार बदलत जातात.
  

प्रत्येक बोधन स्तरावर 'रुपिकांचे दोन भाग पडतात.

१. आसूरू - आशय सूचक रुपिका
२. कासूरू - कार्य सूचक रुपिका

भाषेतील रुपिकांमध्ये जो भाग विशिष्ठ स्तरावर अपेक्षित 'आशय' प्रकट करतो, असे भाषिक रुप आसूरू अर्थात 'आशय सूचक रुपिका' या गटात मोडते. भाषेतील रुपिकांमध्ये जो भाग विशिष्ठ स्तरावर अपेक्षित 'कार्य' करतो, असे भाषिक रुप कासूरू अर्थात 'कार्य सूचक रुपिका' या गटात मोडते.

१. अक्षर बोधन स्तर-

अक्षर बोधन ह्या व्याकरणातल्या तळाच्या स्तरावर भाषेतल्या रुपिकांमधील 'स्पष्ट परंतु अल्पकालीन ध्वनी उच्चार' प्रकट करण्याच काम आसूरू करतात. या विपरीत जे ध्वनी उच्चार 'लयबद्ध व दिर्घकालीन' असतात त्यांना प्रकट करण्याचं काम कासूरू करतात. स्पष्ट परंतु अल्पकालीन ध्वनी उच्चारांना 'क्शर' म्हणता येईल तसेच 'लयबद्ध व दिर्घकालीन' ध्वनी उच्चारांना 'स्वर' म्हटले जाते. जुन्या व्याकरणाच्या मांडणीत 'क्शरा'स व्यंजन म्हटले जाते.
उदा. :- 'गुलाब' ह्या एका भाषिक रुपाला अक्षर बोधन स्तरावर समजून घ्यायचे झाले तर त्यात - 'गु', 'ला', 'ब' ह्या तीन स्वतंत्र रुपिका आहेत. व त्यातील प्रत्येक रुपिकेत 'आसूरू' व 'कासूरू' दडलेले असतात.
अक्षर बोधन स्तरावर 'आसूरू' हे 'क्शरचिन्हं' कोणतं आहे हे दर्शवितात. व 'कासूरू' 'स्वरचिन्हं' कोणतं आहे हे दर्शवितात. म्हणजेचः-
अक्शर     = [ क्शर ]  +  [ स्वर ]
रुपिका     = [ आसूरू ] +   [ कासूरू ]
वर्ण      = [ क्शर चिन्हं ] +  [ स्वरचिन्हं ]
'गु'      =   'ग'  +   'उ'
'ला'     =   ‘ल  +  'आ'
'ब'      =   'ब'  +  'अ' 

२. शब्द बोधन स्तर-

ह्या स्तरावर जी भाषिक रूपं या विश्वातील 'मूर्त'-'अमूर्त' वस्तू, विचार किंवा भावना इत्यांदींचा निर्देश करणारे असतात त्यांचे आकलन होते. अशा भाषिक रुपांना सामन्य भाषेत 'शब्द' म्हटले जाते. अशा शब्दांना 'शब्द बोधन स्तरा'वर रुपिका म्हटले जाते. प्रत्येक रुपिकेत 'आसूरू' व 'कासूरू' दडलेले असतात.

रुपिम :
भाषेतील काही रुपिका कार्याच्या दृष्टीने एकत्र येऊ शकतात. एकसमान कार्य करणाऱ्या रुपिकांच्या गटाला 'रुपिम' म्हणतात. आसूरू हे रूपिम शब्दकोशात सामाविष्ट असतात. व भाषेत ते आपल्या येण्याने विषयाच्या आशयाचे नेमके चित्र समोर सादर करतात.
उदा. :-
खालील रुपिकांमध्ये जरी फरक असला तरी त्यातील रुपिम एकच असते. बोलणारा, एकणारा, वाचणारा व लिहीणारा ह्या सगळ्यांना ते माहीत असते.
१. देऊळ, देवळात
२. ससा, सश्याने
३. लाडू लाडवाचा
याउलट कासूरू ह्या रूपिमांना स्वतःचा आशय नसतो. मात्र भाषेत आलेल्या आसूरूंची रीतसर जूळणी (अक्शर बोधन स्तरावर संयोग, वाक्य बोधन स्तरावर 'जुळवणी') करून योग्य अर्थछटा व्यक्त करण्याचे काम करतात.

भाषा भिन्न-भिन्न असल्यातरी आशय मात्र तेच असतात, असू शकतात. काही बाबतीत ते बदलतात. आणि म्हणूनच भाषेतील आसूरू हे संख्येने विपूल असतात. उलट प्रत्येक भाषेतील कासूरूंची संख्या व कार्यपद्धती ठरलेलीच असते म्हणूनच ते मर्यादित असते. एकाच प्रांतातील वा काळातील भाषांमधील वेगळेपण व वैविध्यता त्या-त्या भाषांतील कासूरूंचा अभ्यास करून पडताळता येवू शकते.

ह्या स्तरावर तीन प्रकार असतात.

१. ) पद-विकार :-
दोन रुपिकांमधील किंवा दोन शब्दांमधील निरनिराळ्या संबंधाची जुळणी करणे, हे कार्य ह्या स्तरावर घडते. मराठी भाषेच्या अजून पर्यंतच्या व्याकरणात, 'शब्द बोधन स्तरावरील' आसूरूंना 'धातू' व कासरूंना 'प्रत्यय' असे नाव देण्यात आलेले आहे. प्रत्यय हे धातूंच्या मागोमागच येतात. म्हणजे धातूंना प्रत्यय लागल्यानंतर पूढे आणखी प्रत्यय लागत नाही.
उदा. :-

२. ) पद-सिद्धी :-
रूपिकांपासून शब्द तयार होण्याच्या प्रक्रियेला 'पद-सिद्धी' म्हणूया. रूपिका हि एक अक्षर हि असू शकते, एक शब्द ही असू शकते तसेच एक वा अनेक वाक्य हि असू शकतात. तसेच एक संकल्पना ही असू शकते. अशा रुपिकांना ह्या स्तरावर आसूरूं मध्ये गणता येईल. ह्या स्तरावर अशा एका रूपिकेला आपण आसूरू मानून त्याचा संयोग एका कासूरूशी केला तर त्या पासून जी नवनिर्मिती होते तिला 'पद-सिद्धी म्हणूया. व त्या नव्या निर्मित पदाला 'रूपिम' म्हणावे लागेल. हे नव-नवीन रुपिम आपल्याला शब्दकोशात सामाविष्ठ झालेले दिसतात. ह्यात कासूरूंच्या सहाय्याने 'पद-सिद्धी' होण्यामध्ये जितका पद्धतशीरपणा असतो तितका त्या भाषेत वेगवेगळ्या व नियमित येणाऱ्या अर्थछटा दाखविण्यासाठी चांगलाच उपयोग होतो. हा पद्धतशीरपणा चक्क एखाद्या साचासारखाच काम करतो. व फायद्याचं म्हणजे केवळ त्या साच्याचा 'मतितार्थ' जरी लक्षात ठेवला तरी अनेक रुपिमांचे (शब्दांचे) अर्थ आकलन सहज व अचूक होवू शकते. अशा साचेबद्ध रुपिमांचा भाषेतील वापर बोलण्यातील वा लेखनातील वेळेची व शक्तीची बचत करू शकतात.

३) पदांतर :-
ह्या स्तरावर अर्थवाहक म्हणून कार्याच्या दृष्टीने समान कार्य करणाऱ्या रुपिकांचा एक गट मानता येतो. भाषेत असे एकच सामायिक अर्थ दाखविणाऱ्या अनेक रूपिका असतात. अशा सामायिक अर्थ दाखविणाऱ्या रूपिकांना त्या गटाचे 'आसूरू' म्हणता येते. 'आसूरूं' मूळे त्यातील गटात सामाविणाऱ्या सर्व रुपिकांचा बोध होतो. म्हणजे असे म्हणता येईल कि 'आसूरू' हे पदांतर च्या स्तरावर एक गटवाचक नाम असते. तर त्या गटात असे समान अर्थ दाखविणाऱ्या अनेक रुपिकांना 'कासूरू' म्हणता येईल. कासूरू ही आसूरूंची पदांतरे असतात. कारण आसूरू बदलले की कासूरू ही बदलतात. उदा. :-

पदांतर ची प्रक्रीयेची भाषकाला एकादा का चांगली जाण आली की त्याच्या भाषेत शब्दांचा नेमका व अचूक वापर होवू लागतो. व त्या मूळे समोरच्या व्यक्तीला/ व्यक्तींना ते भाष्य समजून घेणं ही सहजतेचं व विनागैरसमजूतीचं होवू शकते.

३. वाक्य बोधन स्तर 

वाक्य बोधन स्तरावर रुपिकांच्या रचना पद्धती आकळल्या जातात. रुपिका ह्या भाषिक रुंप असतात जी 'शब्द' ही असतात किंवा वाक्य ही असू शकतात. ह्या स्तरावर आसूरू हे थेट व स्पष्ट अर्थ सांगणारे असतात. तर कासूरू हे गर्भितार्थ दर्शविणारे असतात.
शास्त्रीय भाषा किंवा न्यायालयीन भाषा ह्या  आसूरुमय भाषांचे चांगले उदाहरण आहेत. अशा भाषा अगदी स्पष्ट व थेट अर्थ विशद करणारे शब्द, वाक्यरचना यांनीच सजलेल्या असतात. या उलट कधी-कधी भाषेत जे दिसतय वा ऐकू येतेय असे शब्द वा वाक्य ही काही वेगळाच अर्थ सांगून जातात. एकाच दृष्टीने पाहीले तर ते काहिसे संदर्भहीन वाटतात.

उदा. :-  ‘काय रे! हि वानरसेना कुठे चाललीय? ’
ह्या मध्ये :-
'काय रे! ही बाळगोपाळांची फलटण कुठे चाललीय? ' - हे आसूरू यात असू शकतं.
'काय रे! ही उपद्व्यापी कार्टी कुठे चाललीत? ' - हे कासूरू यात असू शकतं.

 ह्या वाक्यात 'वानरसेना' हा शब्द 'कुत्सित' वा 'चेष्टेने' हि येवू शकतो. परंतु ते वाक्य ऐकणाऱ्याने/ वाचणाऱ्याने कसे आकळून घ्यायचे हे त्या व्यक्तिवरच अवलंबून असते. भाषेत कासूरू हे नित्य-नेमाने येणारे शब्द वा वाक्ये असतात. उखाणे, म्हणी, वाक्प्रचार ही कासूरूंची उदाहरणे आहेत. कासूरूंवरूनच एखाद्या भाषेचे वेगळेपण ओळखता येते. आसूरूंवरून मात्र एखाद्या भाषेच्या भाषकांची एखादा विचार किती व कुठल्या स्तरांपर्यंत स्पष्ट व थेट  शब्दात, वाक्यात अर्थ ओतता येण्याची क्षमता दिसून येते.

वरील उदाहरणावरून आपल्याला कळले असेल कि वाक्य बोधन स्तरावर रुपिकांच्या - शब्दांच्या वापरावरून आकलन कसे करायचे. आता पुढील भागात वाक्यांच्या प्रयोगांवरून रचना पद्धती कशा आकळल्या जातात ते पाहू.
त्यांचे प्रत्येकी दोन प्रकार पुढील प्रमाणे-

१. कर्म प्रधान - ज्या वाक्यात क्रियेला महत्त्व असते ते 'कर्मप्रधान वाक्य'. ह्यांत आसूरूयुक्त वाक्ये येतात.
२. भाव प्रधान - ज्या वाक्यात क्रियेच्या वैशिष्ट्यावर भर असतो ते 'भावप्रधान वाक्य'. ह्यांत कासूरूयुक्त वाक्ये येतात.
ह्यांचे अजून त्यांच्या 'प्रयोगानूसार' चार भाग पडतात-

 --------------------------------उल्लेख---------------------------------- रचना -------------

थेट------------------------ थेट उल्लेख (Active Voice)-- ------------------थेट रचना (Direct Speech)
---------------------------कर्म प्रधान-----------------------------------कर्म प्रधान
---------------------------भाव प्रधान-----------------------------------भाव प्रधान

अप्रत्यक्ष -------------------अप्रत्यक्ष उल्लेख(Passive Voice) ------------अप्रत्यक्ष रचना (Indirect Speech)
---------------------------कर्म प्रधान-----------------------------------कर्म प्रधान
---------------------------भाव प्रधान-----------------------------------भाव प्रधान