मराठी वार्षिक (इयरबुक)

आजच्या ईसकाळात ही माहितीवजा बातमी वाचून आनंद झाला.

ई सकाळातील बातमीचा गोषवारा :

पुण्यातील विद्यार्थ्यांनी तयार केले पहिले मराठी इयर बुक

पुणे, ता. २३- महाराष्ट्रातील अश्मयुगीन कालखंडापासून ते सध्याच्या राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, आर्थिक घटनांचा आढावा घेणारे मराठीतील पहिले "इयर बुक' पुण्यामधील काही विद्यार्थ्यांच्या परिश्रमातून तयार.

केवळ महाराष्ट्रातील घडामोडींचा आढावा घेणाऱ्या आणि मराठी भाषेतून प्रकाशित होणाऱ्या संदर्भसाहित्यातील इयर बुकची कमतरता पुण्यातील "दि युनिक ऍकेडमी'च्या विद्यार्थ्यांकडून पूर्ण.

 "प्राग इतिहास ते वर्तमान महाराष्ट्र' असा महाराष्ट्राच्या ऐतिहासिक -सांस्कृतिक, राजकीय-प्रशासकीय व आर्थिक जीवनाचा समग्र वेध घेणारा हा ११०० पानांचा संदर्भग्रंथ बनवण्यास कोणतेही विशेष आर्थिक पाठबळ नसताना, प्रसंगी स्वतःची पदरमोड करून एक वर्षाची मेहनत.

इतिहास-संस्कृती, साहित्य, प्राकृतिक आयाम, अर्थव्यवस्था, राज्यव्यवस्था, महाराष्ट्राचे प्रमुख शिल्पकार, वर्तमान महाराष्ट्र (जानेवारी २००७ ते जुलै २००८) असे प्रमुख विभाग आणि त्यांत प्रत्येक घटकाचा ऐतिहासिक संदर्भ ते वर्तमानकालिक स्थिती असा आलेख मांडला आहे.

अगदी शालेय विद्यार्थ्यांपासून विविध विषयाच्या अभ्यासकांना उपयुक्त ठरेल, अशा पद्धतीने या इयर बुकची मांडणी करण्यात आली आहे.

 दरवर्षी जुलै- ऑगस्टमध्ये हे इयर बुक प्रकाशित केले जाईल. त्यामध्ये त्या त्या वर्षीच्या सर्व घडामोडींचा विस्तृत समावेश करण्यात येईल, अशी माहिती "दि युनिक ऍकेडमीचे संचालक', वार्षिकीचे प्रमुख संपादक आणि या विद्यार्थ्यांचे मार्गदर्शक तुकाराम जाधव यांनी दिली.


पुस्तकाच्या किंमतीबद्दल कुणाला काही कल्पना आहे का?

हा ग्रंथ ऑनलाईनही उपलब्ध होईल का? होण्यासारखा आहे का?

कोणी वाचून त्याविषयी अधिक माहिती दिली तर बरे होईल.