मन किती चंचल असतं...

  मन किती चंचल असतं
स्तब्ध राहणं त्याला माहितंच नसतं
एका जागेवर त्याला रहायचंच नसतं
फुलपाखरांसारखं नुसतं बागडतंच राहतं
मन किती चंचल असतं
एकटेपनाच्या भीतीनं खिन्न होवून जातं
आपुलकीच्या नुसत्या जानीवेनंच पुन्हा खुलून बसतं
विषामृताचा हा खेळ खेळतंच राहतं
मन किती चंचल असतं
प्रेम करणं त्याच्या रक्तात असतं
प्रेमभंग झाला तरीही प्रेम करतंच राहतं
प्रेमापासून वंचित रहानं त्याच्या हातातंच नसतं
मन किती चंचल असतं
देहांतोत्तरही त्याला जीवन मिळत असतं
सुखदुःखाचा आस्वाद घेतंच राहतं
अंत पावणं त्याच्या नशिबातंच नसतं
मन इतकं चंचल असतं
त्याच्यावर मात करनं फार कठीण असतं
ज्यानं मनाला जिंकलेल असतं
जिवन-रहस्य त्याला उलघडलेल असतं