असेच हसू .....नवीन वर्षामध्ये ....

एकदा बिल गेटस मायक्रोसॉफ्ट युरोप च्या आणि अमेरिकेच्या शाखांसाठी २ नवे चेअरममेन घेण्याचे ठरवतो आणि मुलाखतीला ५००० लोक येतात. सर्व लोक एकत्र जमतात एका हॉल मध्ये. त्यात एकाचे नाव आहे मि. म्हात्रे.

मुलाखत सुरू होते.

बिल : ज्यांना जावा येत नाही त्यांनी कृपया हॉल सोडून जावे
२००० लोक उठून जातात
मि. म्हात्रे: (मनामध्ये) : मला जावा नीट येत नाही पण तरी इथे मी बसून राहिलो तर काय फरक पडतोय. मी काही गमावत तर नाही. जरासा अनुभव मिळेल आणि बसून राहतो.

बिल : ज्यांनी १००० हून जास्त लोकांना मॅनेज केले नसेल त्यांनी कृपया हॉल सोडून जावे
२००० लोक उठून जातात
मि. म्हात्रे: (मनामध्ये) : मी जास्तीत जास्त २० लोकांना मॅनेज केले असेल पण तरी इथे मी बसून राहिलो तर काय फरक पडतोय. मी काही गमावत तर नाही. आणि बसून राहतो.

बिल : ज्यांनी मॅनेजमेंट ची डिग्री घेतली नसेल त्यांनी कृपया हॉल सोडून जावे
५०० लोक उठून जातात
मि. म्हात्रे: (मनामध्ये) : मी मॅनेजमेंट ची डिग्री घेतली नसेल पण तरी इथे मी बसून राहिलो तर काय फरक पडतोय. मी काही गमावत तर नाही. आणि बसून राहतो.

बिल : ज्यांना Serbo - Croat ही भाषा येत नसेल त्यांनी कृपया हॉल सोडून जावे
४९८ लोक उठून जातात
मि. म्हात्रे: (मनामध्ये) : मला Serbo - Croat ही भाषा येत नसेल पण तरी इथे मी बसून राहिलो तर काय फरक पडतोय. मी काही गमावत तर नाही. आणि बसून राहतो.

आता हॉल मध्ये दोनच लोक राहतात
बिल त्यांना म्हणतो की अरे वा आता तुम्ही दोघच आहात की जे माझ्या सर्व पात्रता अटी पूर्ण करू शकत आहात
तर आता मला तुम्ही दोघांनी " Serbo - Croat" या भाषेतून केलेले संभाषण ऐकायला आवडेल

मि. म्हात्रे (शांत पणे पण चटकन दुसऱ्या उमेदवाराकडे पाहून): कसा आहेस रे तू?

:
:
:
:

दुसरा उमेदवार (हसत) : मी बरा रे.. तू सांग.

जय महाराष्ट्र!!

नवीन वर्षाच्या सर्व मनोगतींना हार्दिक शुभेच्छा!!

-पल्लवीसमीर