मसूर मिंट कटलेट

  • १ वाटी मसूर डाळ
  • कोथींबीर
  • पुदिना
  • आलं + मिरची + लसूण पेस्ट
  • ब्रेड क्रम्स
  • तिखट
  • मिठ
  • हळद
  • तळण्यासाठी तेल
१५ मिनिटे
२-४ जणांसाठी
  1. प्रथम मसूर डाळ शिजवून घ्यावी, व नंतर त्यातील पाणी काढून डाळ बाजू ला ठेवावी. (डाळ जास्त शिजवू नये. )
  2. शिजवलेली डाळ, कोथिंबीर , पुदिन्याची थोडी पाने मिक्सरमधून एकजीव करून घ्यावे. (आवश्यक असल्यास पाणी घालावे. पण मिश्रण घट्टसर राहील ही काळजी घ्यावी.)
  3. आता या मिश्रणात १ चमचा आलं, मिरची, लसूण यांची पेस्ट, तिखट, मिठ, किंचीत हळद(आवडीनुसार) घालून चांगले मिसळावे.
  4. वरील मिश्रण जर गोळे करण्याइतपत घट्ट नसेल तर  थोडे ब्रेड क्रम्स घालून मिश्रण चांगले मळून घ्यावे.
  5. आता या मिश्रणाचे मध्यम आकाराचे गोळे करून त्याना हवा तो आकार देउन बाजुला ठेवावेत.
  6. तळण्यासाठी तेल तयार ठेवावे.
  7. आता आधी तयार करून ठेवलेले मिश्रणाचे कटलेट ब्रेड क्रम्स मध्ये घोळवून गरम तेलात खरपूस तळून घ्यावेत. आणि शक्यतो गरम गरमच सर्व्ह करावेत.

मिश्रणाचे गोळे केल्यानंतर देखिल जर गोळे आवश्यक तेवढे घट्ट झाले नसल्यास सर्व गोळ्याना आकार देउन ते थोडा वेळ फ्रीज मध्ये ठेवावेत व १०-१५ मिनिटांनी तळून घ्यावेत.

टोमॅटो सॉस किंवा पुदिन्याच्या चटणी बरोबर हे कटलेट छान लागतात. 

स्वयंप्रयोग