तिळ गुळ घ्या गोड बोला!!!
गुलाबी गुलाबी थंडी पौषाची
उष्णता वाढवी गोडी तिळाची
पतंग घेतात आकाशात उंच उंच भरारी
नटून ओवसण्यात दंग होते बायकांची स्वारी
१४ जानेवारीला होते मकरसंक्रमण
तिळतिळाने वाढो नात्यातले आपलेपण
सदा राहावा प्रेमाचा रंगसुगंध ओला
तिळ गुळ घ्या अन गोड बोला ! ! !