जे स्वप्न पाहीले तुम्ही, तो देश कुठे बापू
सत्याच्या मार्गावर, पावलं का रुठे बापू
अहिंसेचा बलात्कार, करून नाक्यावर
सज्जनांची टोळी पाहा, कशी लुटे बापू
तुम्हाला श्रद्धांजली वाहण्यासाठी आमच्या
डोळ्यात दोन अश्रूंही, का न फुटे बापू
लाठीने कश्या बंदुकाच्या गोळ्या रोखल्या
कैक वर्षा नंतरही, हा प्रश्न न सुटे बापू
तुमच्या एका हाकेची किमया ती पाहा
ताडकन अख्खा देश, तत्पर उठे बापू
स्वतंत्रतेत आम्हास कैद केलेत तरी
गुलामगीरीच्या बेड्या, का न तुटे बापू
सनिल पांगे