'आनंदाचे डोही'

स. न. वि. वि.

महाराष्ट्रातील वंचित जनतेच्या प्रश्नांबाबत गेली अनेक वर्षे प्रयत्नशील असलेल्या 'वंचित विकास' (दुवा क्र. १) या संस्थेचे नाव कदाचित आपणास परिचित असेल. १९८५ मध्ये पुण्यात स्थापन झालेल्या या संस्थेचे महाराष्ट्रात सध्या १३ ठिकाणी काम चालू आहे. १९९३ पासून महाराष्ट्राबाहेर मध्य प्रदेशात छिंदवाडा इथेही संस्थेचा आदिवासी विकास प्रकल्प कार्यरत आहे. महिला सबलीकरण, एडसविषयक जनजागृती, वेश्यावस्तीतील मुलांचा व्यक्तिमत्व विकास, परित्यक्ता व विधवांचे पुनर्वसन, वंचितांच्या प्रश्नांचा अभ्यास व त्या विषयक प्रकाशन अशा अनेक क्षेत्रात वंचित विकासाचे काम वेगाने चालू आहे. या सर्व कार्यात, संस्थेसाठी, लोकाश्रय अत्यंत मोलाचा आहे.

वंचित विकासच्या या विविध प्रकल्पासाठी निधीसंकलनाकरिता
'स्व. मोहन शिराळकर प्रतिष्ठान' तर्फे व  'स्वरालय' निर्मित

'आनंदाचे डोही... '

या कार्यक्रमाचे रविवार दिनांक १५ फेब्रुवारी २००९ सायंकाळी ५ वाजता
'यशंवतराव चव्हाण सभागृह', शिवाजी पुतळ्याजवळ, कोथरुड, पुणे येथे आयोजन केले आहे.

ख्यातनाम संगीतकार श्री. श्रीनिवास खळे यांच्या संगीत रचनांवर हा कार्यक्रम आधारित आहे. या कार्यक्रमात ख्यातनाम गायक कलाकार हृषिकेश रानडे, प्राजक्ता रानडे, विभावरी जोशी, पं. उपेंद्र भट, राहुल देशपांडे यांचा तसेच काही बालकलाकारांचा समावेश असेल.

सदर कार्यक्रमातून  'वंचित विकास' साठी लक्षणीय निधी संकलन व्हावे असा मानस आहे. या कार्यक्रमासाठी जास्तीत जास्त लोकांनी उपस्थित वा प्रायोजक राहून  'वंचित विकास' च्या निधी संकलनासाठी द्यावे असे आम्ही प्रतिष्ठानतर्फे आवाहन करीत आहोत.

तिकिटांचे दरः
३००/२००/१५०/१०० रु. प्रती आसन.

'वंचित विकास' च्या देणगीदारास प्रत्येकी २ अश्या पुढील रांगेतील देणगी प्रवेशिका स्नेहभेट म्हणून दिल्या जातील.
*सर्व देणग्या ८०ग या कलमाखाली करसवलतीस पात्र

संपर्कः
सौ. रुपाली अनिल काळे
roopalikale@hotmail.com
९८९०७०८४५३
-

कळावे लोभ असावा.