आयुष्याच्या वाटेवर ..... भेटले .. कधी ...

प्राणांजय माझ्यावर प्रेम कधीच करू शकली नाही .. अशा माझ्या प्रिय प्राणास

आयुष्याच्या वाटेवर भेटले ते दु:खाचे डोंगर कधी .. तर भेटली ती सु:खाची हिरवळ कधी-मधी ...

वाटेवर भेटले मायेचा आधार देणारे तेजस्वी तारे कधी .. तर भेटल्या नुसत्याच लुकलुकणार्या आभासी चांदण्या कधी-मधी ...

पण तरी हि घेत होतो सर्वातून घेण्यासारख बरच काही ...

संकटे  येत होती नित्याने अन नियमाने .. जात होती मात्र सर्वकाही विस्कटून ...

पण कधी डगमगलो नव्हतो .. पून्हा नव्या आत्मविश्वासाने जूळवत होतो विस्कटलेल सर्वकही ...

मला याची कल्पनाच नव्हती .. आयुष्यात येतात अशी भयाण दुःखे - जिथे नसतो पर्याय पुन्हा जुळविण्याचा  ...

जिथे माझा आत्मविश्वासच विरघळून जाईल ! .. पण तरीही एकच खंत वाटते मनाला ...

आता कदाचित जुळविता जुळविता माझे अस्तित्वच संपून जाईल ... अन आयुष्यात .....

सुरू होईल "पराभव" .. तो देखिल एका "विजयाचा" !

                                              - - - - - - दुर्दैवी प्राणांजय