बीटाचे कटलेट

  • ४ बीट ,
  • १-२ गाजर,
  • २ बटाटे उकडून,
  • ब्रेडचा चुरा,
  • आल,
  • लसुण,
  • मिरची ,
  • कोथिंबिर
  • बारीक रवा,
  • तेल.
३० मिनिटे
४ जणांना पुरतील..

सर्वप्रथम बीट(कच्चंच) साल काढून किसून घ्यावं. तसंच गाजर पण किसून घ्यावं. उकडलेले बटाटे कुस्करून घ्यावेत. आलं, लसूण, मिरची, कोथिंबीर वाटून घ्यावी. हे सर्व पदार्थ एकत्र करावेत. चवीनुसार मीठ घालावं. हे मिश्रण एकसंध होण्यासाठी त्याच्यात ब्रेडचा चुरा घालावा. मग त्याचे लांबट गोल व चपटे आकारात गोळे करून ते बारीक रव्यात घोळवून घ्यावेत. एका तव्यावर थोडं थोडं तेल सोडून हे गोळे शॅलो फ्राय करावेत.. (मराठी शब्द सुचवा) तव्यावर कटलेट टाकल्यानंतर जरावेळ झाकण ठेवावे. एकदा परतल्या नंतर परत जरावेळ झाकण ठेवावे. मग दोन्ही बाजुनी कुरकुरीत झाल्यावर  एका ताटलीत काढून ठेवावेत.

मग टमेटो सोस बरोबर किंवा चटणी बरोबर खावेत...!!!

हि कटलेट जरा वाफ जिरल्यावर खावीत म्हणजे जास्त छान लागतात. झाकण ठेवुन शिजवल्यामुळे बीटाचा उग्रपणा कमी होतो. वाटलं तर ह्या मिश्रणात पालकाची पाने पण चिरून घालू शकता. 

सासुबाई