पालक वाफवलेले वडे

  • बेसन १ १/२ वाटी
  • कांदा १ बारीक चिरलेला
  • पालक ३ वाटी चिरलेला
  • लसुण व आल पेस्ट २ छोटे चमचे
  • तिखट १/२ चमचे
  • मिठ चवीपुरते
  • गरम मसाला १/२ चमचे
  • जिरे १/२ चमचे
  • ओवा १/२ छोट चमचा
  • तेल अर्धा वाटी
१० मिनिटे
  1. बेसन आणि पालक एकत्र करावा
  2. लसुण, आले पेस्ट व कांदे घालावे
  3. जिरे , ओवा , तिखट, मसाला मिठ घालवे.
  4. नंतर पाणी न टाकता चांगले एकजिव चुरावे
  5. पाणि टाकून सैलसर असा गोला करावा व गोळ्याला १ चमचा तेल लावावे.
  6. वड्याचा आकार बनवून ते मायक्रोवेव्ह ओव्हन मध्ये कींवा चाळणी गंजावर ठेवून वाफवुन घ्यावे.
  7. हे वाफवलेले वडे कढई मध्ये थोडेसे तेल घालून शॅलो फ़्राय करावे.
  8. टोमॅटो सॉस सोबत दयावे

याचप्रमाणे कोणत्याही पालेभाजीचे असे वडे बनवता येतील. मेथी, आंबटचुका, सांभार, अळूची पाने, घोळ........

पालेभाज्याचा कटांळा करण्याऱ्याकरीता चांगले.

शितल