मुगाची भजी

  • १ वाटी मुगाची डाळ
  • १ पळी उडदाची डाळ, २ टेबल स्पून तांदुळ
  • ४ लाल मोठ्या वाळलेल्या मिरच्या
  • हळद, हिंग, मीठ , चिरलेली कोथिंबीर मुठभर
  • १ मोठा चमचा धने,१/२ चमचा मिरे
  • १/४ छोटा चमचा सोडा, तळण्यासाठी तेल
३० मिनिटे
४ जणांसाठी

दोन्ही डाळी , तांदुळ व मिरच्या ४ तास भिजवून मिक्सर मध्ये कमी पाणी वापरुन थोडे जाडसर वाटावे. धने व मिरे अर्धे होतील इतकेच कुटावेत. इतर सर्व साहित्य एकत्र करावे. पीठ भज्याइतकेच सैल असावे. गरम तेलात भज्या तळाव्यात. सॉस किंवा खजूराच्या गोड चटणीसोबत गरम गरमच खावीत.

नाहीत.