बनाना ब्रेड

  • ३-४ पिकलेली मोठी केळी
  • १ कप मैदा
  • १/२ कप गव्हाचे पिठ
  • २ अंडी
  • १ कप साखर , थोडी कमीही चालेल
  • १/४ कप बटर
  • १ टी स्पून वॅनिला अर्क
  • १ टी स्पून बेकिंग पावडर
१५ मिनिटे
४ - ६ जण

१>ओव्हन ३५००  फ़ॅरेन्हाईटवर हिट करायला ठेवा.

२ > केळी कुस्करून घेणे.

३> बटर विरघळवून केळ्यामध्ये टाकणे.

४> या मिश्रणात मैदा, गव्हाचे पीठ आणि  बेकिंग पावडर टाकून  नीट एकजीव करणे.

५>अंडी आणि साखर एकत्र करून, फेस येईपर्यंत फेटून घेणे. त्यानंतर हे वरील मिश्रणात घालून एकजीव करणे.

६>९X५ लोफ पॅनला हलके तेल लावून वरील मिश्रण ओतावे. प्रीहिटेड ओव्हनमध्ये १ तास बेक करावे. टूथपीक टेस्ट करून पाहवे. फार छान लागतो.

आवडीनुसार ब्रेडमध्ये मनुका, खजुराचे तुकडेही घालू शकता.

इंटरनेट