कोहळ्याची कोशिंबीर

  • १ वाटी चौकोनी आकारात चिरलेला लाल भोपळा(कोहळे)
  • १/२ वाटी दही
  • २ हिरव्या मिरच्या चिरलेल्या
  • हिंग
  • थोडीशी हळद
  • फोडणीकरीता १/२ चमचा तेल,
  • थोडीशी मोहरी
  • चवीनुसार मीठ
  • गोडलिंबाची २-३ पाने
१५ मिनिटे
२ जण
  1. भोपळ्याच्या फोडी व्यवस्थित उकळून, थंड करून घ्याव्यात.
  2. त्यात दही टाकून चांगले मिक्स करून घ्यावे.
  3. एका कढईत फोडणीकरिता तेल घ्यावे.
  4. त्यात मोहरी, हिंग, मिरच्या आणि गोडलिंबाची पाने टाकावीत.
  5. ही फोडणी भोपळा आणि दह्याच्या मिश्रणात टाकावी.
  6. चवीनुसार मीठ घालावे.

  1. दुधी भोपळ्याची सुद्धा अशीच कोशिंबीर करता येते.
  2. ही कोशिंबीर गरम पोळीसोबत छान लागते.
आई