खाजाच्या करंज्या

  • आवरणासाठीः
  • १ वाटी रवा
  • १वाटी मैदा
  • दूध
  • ५, ६ मोठे चमचे साजूक तूप
  • २, ३ चमचे तांदळाची पिठी/कॉर्नफ्लोअर
  • सारणासाठीः
  • १ नारळ
  • २ वाट्या साखर
  • २ चमचे बदाम/काजू पावडर, मूठभर बदाम, पिस्ते इ. चे तुकडे, बेदाणे
  • वेलचीपूड
  • तळणीसाठी :
  • तूप अथवा रिफाइंड तेल
तीन तास
२०.२२ करंज्या

सारण :
नारळ खवून, साखर व खोबरे एकत्र करून शिजवून घ्यावे. शिजत आल्यावर बदामपावडर, बदाम, पिस्ते, इ. चे तुकडे व बेदाणे घालावेत. वेलचीपूड घालावी अथवा गुलकंद घालावा.
खवा घालायचा असल्यास भाजलेला खवा सारण शिजत आल्यावर घालावा.
आवरण :
एका ताटात तूप फेसावे व ते हलके झाले की तांदळाची पिठी/कॉर्नफ्लोअर घालून अजून फेसावे व गोळा तयार करून वाडग्यात काढून ठेवावा.
रवा व मैदा एकत्र करून दुधात भिजवून तासभर ठेवावा, नंतर तुपाचा हात लावून चांगले कुटून हलका करावा. नेहमीच्या पोळीपेक्षा थोडी जाड पोळी लाटून काट्याने किवा सुरीने तिला टोचे मारावेत. पोळीवर तांदळाची तुपात फेसलेली पिठी लावून घट्ट गुंडाळी करावी. त्याचे साधारण इंचभराचे तुकडे करावेत. तुकडा दोन्ही बाजूनी पिरगाळून त्याची लाटी करावी. ती पुरीप्रमाणे लाटून सारण भरावे आणि करंजी कातावी. अशा सर्व करंज्या कराव्यात.
तयार झालेल्या करंज्या ओलसर फडक्याखाली झाकून ठेवाव्यात म्हणजे वाळणार नाहीत.
मंद आचेवर करंज्या तळाव्यात.

१) ४, ५ चमचे गुलकंद वेलचीऐवजी घातला तरी वेगळा, सुंदर स्वाद येतो.
२)खवा हवा असल्यास अर्धी वाटी खवा घेऊन भाजून घ्यावा आणि अर्धी वाटी साखर जास्त घ्यावी.

आई