माझ्या जिवनात दोनच थेंब
एक पाण्याचा एक अश्रुचा
अश्रुचा थेंब ढळाढळा गळतो
पाण्याच्या थेंबास जिव मात्र जळतो
सोबतीला फ़क्त दोघच
एक आगेचा लोळ
तर दुसर
काखेतल शेंबड पोर
अथांग वाळुच्या सागरात
उठतात हे आगेचे लोळ
एक सुर्याच्या अंगणात
तर दुसरा
भुकेल्या पोटात
असच जिवन रणरण भटकत
काखेतल पोर
भुकेन रडत
पोरास मग दाखवाव लागत
दुर उठणार मृग़जळाच जाळ
पोटाची भुक पाण्यान भागणार
आशेन पोर गालातच हसतं
तरीसुद्धा आम्ही
जीवनाच घरट थाटलयं
मायेच्या अंगणात
प्रेमाच्या चांदण्यात