आले मी परदेशी सख्या सवे माझ्या,
स्वप्ने काही उरात घेवुनी माझ्या!
सगळेच आहे सुरेख आणि नेटके. पण....
घरांच्या द्वारांसम मनाची दारे ही बंद इथे!
कधी कधी मज वाटे, हिवाळया मध्ये सारे गोठुनी जाते ,
तसे मने ही गोठली आहेत का साऱ्यांची !
माणसे विसरली आहेत माणूसकीला,
असूनही धरेवर मज वाटे मी असे का परक्या ग्रहावरला?
लवकर ने रे देवा मायदेशी मला,
परक्या भूमीत जीव माझा घुसमटला!
सगेसोयरे याचा अर्थ नव्याने उमगे मला!
धावते मन माझे आठवणीत तयांच्या!
सावकरांना का स्फुरली असेल कवीता,
तळमळला का जीव त्यांचा उमगले काहीसे मला!
मी पण विनवते देवा,
लवकर ने रे मला मातृभूमी ला!