ऍबॅकस

मंडळी, हल्ली आपल्याकडे ऍबॅकसचे बरेच वर्ग निघाले आहेत. ४-५ वर्षाच्या मुलांना पटापट गणिते करताना पाहिले ना की खरेच त्यांचा हेवा वाटतो, काश आपण लहान असताना आपल्याला अशी एखादी सोपी पद्धत माहित असती गणितं करायची असे राहून राहून वाटतं. ह्या तंत्राबद्दल मज्या मनात काही शंका आहेत त्याची उत्तरे आपल्यापैकी कुणाला माहीत असल्यास कृपया मार्गदर्शन करावे.

१. पुण्यामधली चांगली ऍबॅकस ऍकॅडमी कोणती?

२. तिथे शिकवणाऱ्या शिक्षकांची गुणवत्ता कोण तपासते? त्यांना काही परिक्षा वगैरे द्याव्या लागतात का?

३. ऍबॅकसच्या ज्या परीक्षा होतात त्याच्या प्रश्नपत्रिका कुठून येतात? माझे मूल एखाद्या ऍकॅडमीतून २ लेव्हल पार करून दुसऱ्या एखाद्या ऍकॅडमीमध्ये गेले तर आधीच्या लेव्हलस ग्राह्य धरल्या जातील का?

४. थोडक्यात, एखादी governing body आहे का ज्यांना ह्या सर्व संस्था report करतात? जेणे करून शिक्षक आणि ऍबॅकस शिक्षण संस्थांवर कुणाचा तरी वचक राहील. नाही तर ह्या संस्थांच्या गुणवत्तेची आणि त्यांच्या कडून मिळणऱ्या प्रशस्तिपत्रकाची हमी कशी मिळणार?