युती

शनी गेला मंगळाकडे
मागायाला हात
म्हणे, युतीनं आपण दोघे
करू सर्वांवर मात

मंगळ म्हणे शनीला,
'रंग माझा बदलतो आहे..
पृथ्वीवरचा माणूस आता..
इकडेच यायला निघतो आहे.. '

चंद्र म्हणे, 'माणसाचा ..
आता भरवसा नसतो-
अक्षता मला टाकतो ..
पाहून रोहिणीला हसतो'

राहु-केतूने ऐकला संवाद
म्हणे त्यांना - सावध रहा
माणसासाठी अधुन-मधून
आपापली स्थाने बदलत राहा