गाजराची कोशिंबीर

  • ४ ते ५ मध्यम आकाराची गाजरे
  • कोथींबीर अर्धी जूडी बारीक चिरून
  • दोन हिरव्या मिरच्या चिरून
  • अर्ध्या लिंबाचा रस
  • मीठ
  • साखर
  • दाण्याचा कुट
  • तुप आणि जिरे फोडणीसाठी
५ मिनिटे
४ माणसांसाठी

  प्रथम गाजरे खिसून घ्यावीत . नंतर त्यामध्ये बारीक चिरलेली कोथींबीर मिसळावी.

दाण्याचा कुट , लिंबाचा रस , मीठ , साखर घालून मिक्स करून घ्यावे.

फोडणीसाठी तुप गरम करावे नंतर जिरे टाकून तडतडीत फोडणी घालावी.

तूप नको असेल तर तुम्ही जिरेपुड चवीसाठी टाकू शकता.

१‌. साध्या मिठाऐवजी काळे मीठ वापरल्यास अधिक छान लागते.

२. अशीच तुम्ही बीट आणि काकडीचीही कोशींबीर बनवू शकता.