कविसंकेत...

मराठी साहित्यात काही कविसंकेत रूढ आहेत. ते सर्व मुळ संस्कृतमधून आले आहेत. असे काही संकेत मी येथे काही देत आहे. हे संकेत म्हणजे समजूती आहेत. ते वैज्ञानिक सत्य असेलच असे नव्हे.

१. चकोर पक्षी केवळ चांदणे पिऊन जगतो, तर चातक फक्त पावसाचेच पाणी पितो.

२. गरूड जेव्हा नागाला पकडण्यासाठी झेप घेतो, तेव्हा नाग मंत्रमुग्ध होतो, काहीही हालचाल करीत नाही. या त्याच्या नजरबंदीस गारूड म्हणतात.

३. नागाला दूध आवडते. संगीत आवडते. तो पुंगी वाजवली की डोलतो. (वस्तुतः नागाला कान हा अवयवच नाही. )

४. हंस पक्षाला दूध आणि पाणी एकत्र दिले तर ते वेगवेगळे करता येते.

५. कोकीळा फक्त वसंत ऋतुत गाते. हे खरे नव्हे! गातो तो नर कोकीळ!! अनेकदा वसंत ऋतू खेरिज देखील त्यांचे गाणे ऐकायला मिळते.

६. लांडगा अति खादाड आहे. संस्कृत मध्ये त्याला वृक म्हणतात. भीम देखील खादाड होता. म्हणून त्यास वृकोदर- 'लांडग्याच्या पोटाचा' म्हणतात.

असे अणखी किती तरी संकेत आहेत. कोणी अधिक माहिती देईल? मला हवे आहेत. कदाचित त्यात काही वैज्ञानिक सत्य ही असू शकेल. त्या बद्दल ही जरूर कळवावे.