मराठी पुस्तके आता सीडीमध्ये

मराठी पुस्तके आता सीडीमध्ये

कॉंप्युटर आणि दूरचित्रवाहिन्यांच्या आक्रमणामुळे मराठी वाचन संस्कृती लोप पावत चालली असल्याची ओरड करण्यात येत असते. काही प्रमाणात ते खरेही आहे. मात्र या अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर जर वाचनसंस्कृती वाढविण्यासाठी करून घेतला तर नवी पिढी वाचनाकडे वळेल, त्यांच्यात वाचनाची गोडी निर्माण होईल, या उद्देशाने पुण्यातील उत्कर्ष प्रकाशनाने एक आगळा उपक्रम हाती घेतला आहे.
परदेशात असणाऱया मराठी वाचकांसाठी ही सोय करण्यात आली असली तरी येथील मराठी वाचकानाही इंटरनेटच्या माध्यमातून ही डीजीटल
पुस्तके सीडी स्वरुपातही उपलब्ध करून देण्यात आली आहेत. ही डीजीटल पुस्तके टेक्स्ट व ऑडिओ स्वरुपात आहेत. या सीडी संगणक वापरासाठी असून सध्या श्रीपाद कृष्ण कोल्हटकर यांचे सुदाम्याचे पोहे, डॉ. कटककर यांचे अंकज्योतिष व हस्तसामुद्रिक तसेच गिरकी, देवाघरचा पाऊस आदी पुस्तके सीडी स्वरुपात वाचकांसाठी मिळू शकतात.
मराठी पुस्तके आणि मासिके डाऊनलोड करण्यासाठी www.mmsdigital.com या संकेतस्थळालाही भेट देता येऊ शकेल. याच संकेतस्थळावर मराठी पुस्तके व मासिकेही डाऊनलोड करता येऊ शकतील. तसेच हवी असलेली पुस्तके वाचकांना या संकेतस्थळाच्या माध्यमातून थेट इंटरनेटवर क्रेडीट किंवा डेबीट कार्डाद्वारे विकत घेता येतील. सीडी स्वरुपातील पुस्तकांसह मराठीतील मेनका, माहेर आदी मासिकेही थेट नेटवर वाचता येऊ शकतील. साहित्यप्रेमी वैद्य यांनी ही सोय उपलब्ध करून दिली आहे.
या संदर्भात अधिक माहितीसाठी इच्छुकांना info@mmsdigital.com या ईमेलवर किंवा ०२०-२५३६२२५९ या दूरध्वनी क्रमांकावर संपर्कही साधता येऊ शकेल.