आयुष्याच्या वाटेवर चालताना ;
अचानक भेटला तो मला;
रात्रीच्या अंधारात जसा;
चमकला काजवा.
मि हि वेड्यासारखी धावत राहिले
त्याच्या प्रकाशाने भारुन;
त्याच्या वागण्या बोलण्यात;
स्वतःला शोधत.
मी किती वेडी होते हे ;
मला तेव्हा कळलं;
जेव्हा त्याने माझं ;
आस्तित्वच नाकारलं.
माझी कठपुतळी बनवून;
तो निघून गेला;
जाताना मात्र तो माझा;
श्वासच घेउन गेला.
तरीही मी किती वेडी;
अजून ही आशा आहे मला;
मृगजळाच पाणी ;
व्हायचंय मला.