आयुष्याचा अर्थ शोधताना;
निरर्थक झालं ते कधी कळलंच नाही मला;
दैवाचा अर्थ लावताना;
कधी फुटलं माझं नशीब कळलंच नाही मला.
आकाशाला गवसणी घालण्याआधी;
पंखांच बळ ओळखायचं असत;
मी मात्र कपाळमोक्ष झाल्यावर;
झेपावण्याची उंची मोजायचा केला प्रयत्न.
आतापर्यंत काय कमावलं याचा;
सहजच एक दिवस विचार केला;
पेला पूर्णं भरला म्हणता म्हणता ;
अर्धा रिकामाच राहून गेला.
संपली सारी उमेदच आता;
उरले फक्त आठवणींचे थवे;
डोळ्यातले अश्रू लपवायला;
मी पापण्यांचेच वलय पांघरले .