माझे मन....

खंत माझ्या मनातली, जाणतील जेव्हा तारे,
विसरून दिशा दाही, भांबावतील हे वारे,

खोली माझ्या मनाची, मापतील जेव्हा सागरे,
कळेल त्यांना माझ्या मनाला, न अतृप्त हे किनारे,

साम्राज्य माझ्या मनाचे, पाहील जेव्हा धरे,
दिसेल तिला ही निद्रिस्त, सुख:दुखा:ची रुजणारी अंकुरे,

नवलाई माझ्या मनाची, पांघरतील जेव्हा झाडे,
भेटेल त्यांना हिरवळीत या, एक तरू वठलेले,

अवखळ या माझ्या मनाची, खळ-खळ सुनतील जेव्हा झरे,
स्फुरेल त्यांना ही वाहणारे, माझे माणुसकीचे गाणे

मी अलिप्त या जगाशी तरी, विचारील चांदणे,
घेतल्यास पदरात उल्का परी तू, का न झेललीस नक्षत्रे?

यात्री मी जीवनाची, अन असेच माझे भटक्यापरी भटकणे,
सुख:दुखा:तून, व्यथे-कथेतून, माझे हे बरसणे, तरसणे....

*******************************