सुंठीची कढी

  • फार आंबट नसलेले ताक २-३ वाट्या
  • सुंठीचे पाळे, नसल्यास २ चिमटी सुंठ चूर्ण
  • शेंदेलोण, पादेलोण व मीठ समप्रमाणात
  • हिंग चिमूटभर
५ मिनिटे
२ माणसांसाठी

ताकात सुंठीचे पाळ थोडे सहाणेवर उगाळून घालणे. नसल्यास सुंठीची पूड मिळते ती वापरणे. चवीप्रमाणे मीठ, शेंदेलोण, पादेलोण घालून चिमूटभर हिंगही घालणे. गॅसवर मंद आंचेवर ह्या ताकाला उकळी आणणे. उकळी आल्यावर ताक फुटते. झाली सुंठीची कढी तय्यार! गरमागरम कढीचा सूपप्रमाणे स्वाद घेणे.

ही कढी अतिशय औषधी व पाचक असून पोटाचे आरोग्य जपण्यास मदत करते. आम्ही लहान असताना आमची पोटे बिघडली की आजी ही चवदार कढी आम्हांला प्यायला द्यायची. लगेच पोट ताळ्यावर यायचे. ह्या कढीत सुंठीचा वापर असल्याने थंडीत पण प्यायला मजेदार.

आजी