व्हाईट सॉसमधील दुधीची भाजी

  • दुधी पाव किलो
  • २ कप दूध
  • २ टेबलस्पून लोणी
  • २ टेबलस्पून मैदा (पर्याय तांदळाचे पीठ)
  • चवीप्रमाणे मीठ व मिरपूड
१५ मिनिटे
२ जणांसाठी

सर्वप्रथम दुधीच्या साली काढून त्याचे मध्यम चौकोनी आकाराच्या फोडी करणे. ह्या फ़ोडी पाण्याच्या वाफेवर शिजवून घेणे. एका नॉनस्टिक पॅनमध्ये गॅसच्या सौम्य आंचेवर लोणी पातळ करून त्यात मैदा रंग न पालटता परतणे. त्यात हळूहळू दूध घालत ढवळत राहणे जेणेकरून गुठळ्या होणार नाहीत. ह्या व्हाईट सॉसला जरा उकळी आली की त्यात शिजलेल्या दुधीच्या फोडी घालून ढवळणे. वाढताना मीठ, मिरपूड घालून देणे. पोळी वा ब्रेडबरोबर खायला मस्त! सोबत टोमॅटो केचप असला तर अजूनच छान.

सजवण्यासाठी आयत्या वेळेस चिरलेली कोथिंबीर व किसलेले चीजही घालू शकता.

कोठेतरी वाचली व करून पाहिली!