डायरी

तू म्हणायचीस
टाक फाडून
माझ्या उल्लेखाचं
पान तुझ्या डायरीतलं
आणि काल कधी नव्हे ते
तुझं म्हणणं मी मनावर घेतलं

पण आज !
आज माझ्या डायरीत
एकही पान नाही उरलेलं
कारण प्रत्येक पानाच्या
प्रत्येक ओळीत
नाव तुझंच होतं ठळकपणे कोरलेलं !
नाव तुझंच होतं ठळकपणे कोरलेलं !!