सोप्पा पास्ता..!

  • पास्ता - १ वाटी
  • दुध - ४ चमचे (टे. स्पून)
  • (गार्लिक) चीज/बटर - १ चमचा (टे. स्पून)
  • टोमॅटो केचप - ४ चमचे (टे. स्पून)
  • मीठ
२० मिनिटे

पास्ता शिजवून घ्या. साधारण १०-१५ मिनिटे लगतात. मायक्रोवेव्ह असेल तर लवकर शिजेल.

गॅस वर पॅनमध्ये गार्लिक चीज घ्या. ह्यामधे शिजवलेला पास्ता घाला. मग केचप घाला. २ मिनिटे मिक्स करून त्यात दुध घाला व मिक्स करा. त्यात चवीनुसार मीठ व एक चिमुट साखर घाला.

झाला पास्ता तयार.. !!!

दुसरा प्रकार

- चीज मध्ये हवे असेल तर मशरुम, ब्रोकोली परतून मग शिजवलेला पास्ता घालवा.

माझा प्रयत्न